Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरातून जाणारा इंदोर-पुणे महामार्ग बायपास करण्यात यावा – रिपाईची मागणी !

Nov 18, 2021

मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा पुणे-इंदोर महामार्गाला बायपास द्वारे शहराच्या बाहेरून नेण्यात यावा या मागणीचे निवेदन रिपाईचे युवा नांदगाव तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी उपविभागीय अभियंता यांचे माध्यमातून राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना केली आहे.

मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा राज्य महामार्ग क्र.10 हाच राष्ट्रीय महामार्ग 752 जी इंदोर – पुणे मार्गावर दिवसेंदिवस अपघात होण्याचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या कित्येक दिवसापासून हा महामार्ग नसून मृत्युचा सापळा झाला आहे. अनेक नागरिकांचे अपघात होऊन त्यांना कायमचे अपंगत्व आले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. हा महामार्ग देशभरातील दळणवळणातील महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून देखील ओळखला जातो. या महामार्गाने रोज हजारो अवजड वाहने ये-जा करत असतात.

मनमाड शहरातील सहा शाळा, मनमाड बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय, विविध धर्मियांची धार्मिक स्थळे, बँका, पेट्रोल पंप आदि महत्वपूर्ण ठिकाणे असल्याने वाहतुकीची मोठी वर्दळ असते, या महामार्गाला जागोजागी खड्डे पडले असून त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी उड्डाणपुलावर मोटारसायकल मागे बसलेली गरोदर महिला या मोटरसायकलचा केवळ खड्डया चुकवितांना अपघात होऊन महिला गाडीच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाली होती व उपचारादरम्यान गरोदर महिला व तीच्या बाळाचा मृत्यु झाला तसेच याच दरम्यान पेट्रोल पंपसमोर रस्त्यावर खड्डा चुकीताना अपघात होऊन युवकाचा मृत्यु झाला तसेच कालही पांझरनदी पुलावर खड्डे चुकीतांना अॅक्टीव्हावरील इसमाचा अपघात होऊन जागीच मृत्यु झाला असे अनेक रहदारी करणारे नागरीक वेळोवेळी अपघात होऊन जखमी सुध्दा झालेले आहेत म्हणून हा राष्ट्रीय राज्य महामार्ग मनमाड शहरातून जात असल्याने तो नागरीकांसाठी मृत्युचा सापळा ठरत आहे त्यामुळे हा महामार्ग शहराच्या बाहेरुन बायपास करण्यात यावा, अन्यथा रिपाइं (आ) व्यापक जनहित लक्षात घेता कुठलीही पुर्व सूचना न देता तिव्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा रिपाईचे युवा नांदगाव तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकले यांनी एका निवेदन द्वारे दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]