Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पुरात वाहून गेलेल्या नागरिकाच्या वारसांना मदतीचा धनादेश वाटप !

Nov 18, 2021

सप्टेंबर महिन्यात नांदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. आ.सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने नैसर्गिक आपती निधी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मदत मंजूर करून घेत मृत व्यक्तींच्या परिवारातील कायदेशीर वारस असलेल्या व्यक्तींच्या हाती तहसीलदार सिध्दार्थ मोरे आणि अंजुम कांदे यांच्या हस्ते स्टेट बँकेचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

तालूक्याती भालूर येथील मृत दगडू सुखदेव पानेकर यांच्या पत्नी रोहिणी पानेकर तसेच कळमदरी येथील मृत नीलेश जयप्रकाश परदेशी यांची आई रंजना परदेशी व वडील जयप्रकाश परदेशी यांना प्रत्येकी चार लाख रुपये नैसर्गिक आपत्ती निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख संगीता बागूल, तालुकाप्रमुख विद्या जगताप, नांदगाव शहरप्रमुख रोहिणी मोरे, जि.प. सदस्य रमेश बोरसे, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, किशोर लहाने, नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव, मनोज पगार, देविदास पगार, शरद सोनवणे, तलाठी औचर आदि उपस्थित होते. 

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]