Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आंदोलनाच्या समर्थनार्थ निघालेले एस.टी.कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात..!

Nov 20, 2021

गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेले एस.टी. कामगारांचे आंदोलन अधिकच किचकट होत चालले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या एस.टी. कामगारांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या मनमाड आगारातील २१ एसटी कर्मचाऱ्यांना मनमाड पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. मनमाडहुन पंचवटी एक्स्प्रेसने हे आंदोलक मुंबईकडे निघाले होते. सकाळीच मनमाड रेल्वे स्थानकातच पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.

एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी चक्काजाम करत आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे शासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, आज राज्यभरातील एसटी कर्मचारी मंत्रालयावर धडक मोर्चा नेत असून या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनमाड बस आगारातील २१ एसटी कर्मचारी देखील सहभागी होण्यासाठी सकाळी मनमाडहुन मुंबईकडे निघाले होते सकाळी पंचवटी एक्सप्रेसने हे आंदोलक मोर्चेकरी मनमाड रेल्वे स्थानकाकडे जात असतानाच पावणे सहा वाजता त्यांना पोलिसातर्फे रेल्वे गेटजवळ अडविण्यात आले. आंदोलकांची समजूत काढण्यात आली, मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत आम्ही काही गुन्हेगार नाही किंवा अन्याय करणारे नाही, आम्ही आमच्या न्याय्य हक्कांसाठी जात असताना ही अडवणूक का? असा प्रश्न मनमाडच्या आगारातील संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.

अजून बातम्या वाचा..

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मनमाड - येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ जून २०२४ ला नवीन शैक्षणिक वर्षाची...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड - नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]