Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक : कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Nov 24, 2021

आज मोदींच्या नेतृत्त्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी देशवासियांना संबोधित करताना तिनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. आता पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं कायदे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरु केली आहे. आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तिनही कृषी कायदे मागे घेण्यासाठी एक विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित करण्यात येणार आहे. त्यानंतरच मोदी सरकारनं लागू केलेले तिनही कृषी कायदे घटनात्मक प्रक्रियेनुसार, रद्द होतील. मोदी कॅबिनेट आज या तिनही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करु शकतात. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पीएमओ कार्यालयात आज सकाळी 11 वाजता सुरु होईल. 

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]