Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ॲमेझॉनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : मनमाड टिम केट व व्यापारी महासंघाची मागणी !

Nov 24, 2021

अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ॲमेझॉन यांनी ऑनलाईन माध्यमातून नशिली पदार्थाचे विक्री केली त्याबद्दल त्याच्यावर मध्यप्रदेश येथे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पुलवामा हल्ल्यामध्ये जे केमिकल वापरले गेले होते ते देखील ॲमेझॉन या कंपनीने ऑनलाइन विकलेले होते. हा फार मोठा राष्ट्रद्रोह आहे. त्यासाठी ॲमेझॉन या कंपनीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी सर्कल कार्यालय मनमाड येथे कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स मनमाड शाखा व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.

तसेच कपडे व फुटवेअर वर वाढवलेले जीएसटीचे दर पूर्ववत करण्यात यावेत, हि विनंती देखील निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे.
प्रास्ताविक कॅटचे कल्पेश बेदमुथा यांनी केले. मनमाड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेन्द्र पारीक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष सुरेश लोढा,अनील गुंदेचा, सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सोनवणे, उपाध्यक्ष योगेश भंडारी, महासंघाचे खजिनदार मनोज जंगम, ज्येष्ठ व्यापारी गुरुजितसिंग कांत, शांतीकाका गांधी, परेश बुरड, कुमार मेहानी, बलबीरसींग कांत, दिपु चावला, सुनील छाब्रिया, कैलास लोढा, अभिजित लोढा, हुसेनभाई शेख, प्रमोद भाबड, कमलेश लोढा, जसवीतसिंग ठकराल, रितेश लोढा आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]