loader image
[ays_poll id=7]

जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर : २१ डिसेंबरला मतदान !

Nov 24, 2021


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, कळवण या ५ नगर पंचायतींचा समावेश आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात या संदर्भातील आचार संहिता नमूद करण्यात आली आहे. त्या नुसार दि.२९ नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना निहाय मतदार यादी प्रसिद्धी करण्यापासून सुरुवात होणार असून दि.२१ डिसेंबर रोजी मतदान व २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करून निवडणूक कार्यक्रमाची सांगता होईल.

राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्र व शपथपत्र सहजरित्या भरता यावे यासाठी ऑनलाइन व्यवस्था केली आहे. सर्व उमेदवारांना ऑनलाइन नामनिर्देशन पत्र भरने अनिवार्य आहे. यासाठी http://panchayatelection.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करून नामनिर्देशन पत्र व शपथपत्र यामध्ये माहिती भरून स्वाक्षरी करून विहित वेळेत व विहित पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करावे.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.