loader image
[ays_poll id=7]

एस.टी.कर्मचारी आंदोलन : विलीनीकरणाच्या मागणी वर ठाम – आज निर्णय होण्याची शक्यता !

Nov 25, 2021


राज्य शासनाने इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केल्यानंतर सुध्दा कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, यामुळे एस.टी.कर्मचारी आंदोलनाचा तेढ अजूनही कायम असुन यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. मात्र, या निर्णयानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. संप मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटना आज, गुरुवारी निर्णय जाहीर करणार आहेत.

विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साधारण ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात येणार आहे. एसटीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे परब यांनी सांगितले. याशिवाय वेळेवर वेतन, प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासनही शासनाने दिले. यामुळे महिन्याला ६० कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडेल.

वेतनवाढीच्या निर्णयानेही एसटी कर्मचारी संघटनांचे समाधान झालेले नाही. या संघटना विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करून गुरुवारी संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
.