भारतीय खाद्य निगम, मनमाड यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचार संकल्पनेला तिलांजली वाहत येथील अधिकाऱ्यांनी मनमानी करत एकाही नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहचवली नाही. इतकेच नाही तर कामगारांना काम सोडून कार्यक्रमाला वेठीस धरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच शासकीय कार्यालयामध्ये कार्यक्रम घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सूचना करण्यात आल्या असतांनाही येथील भारतीय खाद्य निगममधील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला तिलांजली देत ठराविक लोकप्रतिनिधीना आमंत्रित करून एकाही सर्वसामान्य नागरिकांना न बोलविता कार्यक्रम उरकता घेतल्याचा प्रकार समोर आला केंद्र सरकारच्या विविध योजना, अंत्योदय योजना, अन्नपूर्णा योजना, संपूर्ण ग्रामीण योजना, मध्यान्ह भोजन योजना यासारख्या अनेक योजना या चित्रफितीद्वारे सर्वसामान्यांना दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पोहचविणे गरजेचे असतांनाही या अधिकाऱ्यांनी मनमानी करत कार्यक्रम आटोपता घेत सोपस्कार पार पाडले इतकेच नाही तर या कार्यक्रमाला सर्वसामान्यांना न बोलविता भारतीय खाद्य निगम मधील कर्मचारी काम सोडून या कार्यक्रमाला उपस्थित होते जेणेकरून कार्यक्रमाला खूप गर्दी आहे असे भासविण्याचा प्रयत्न या अधिकारी वर्गांकडून केला गेला विशेषतः हा शासकीय कार्यक्रम असतांनाही तालुक्याचे एकही लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे यांना बोलविण्यात आले नाही सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधीनाही टाळण्यात आले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे भाजप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना देखील कार्यक्रमाचे कुठेही निमंत्रण देण्यात आलेले नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.











