loader image
[ays_poll id=7]

आता 7/12 वर मालकाचा आधार क्रमांक देखील असणार!

Dec 1, 2021

सातबारा उताऱ्यावर मालकांच्या नावाबरोबरच त्यांचा आधार क्रमांक नोंदविण्याच्या योजनेला पुन्हा गती आली असून त्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राकडून (एनआयसी) संगणक प्रणाली तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

डिजिटल सातबारा प्रकल्पातील योजनेचे हे पुढचे पाऊल असणार आहे. सातबारा उताऱ्यावरील आधार नोंदीमुळे जमीन खरेदी-विक्रीमधील गैरव्यवहार रोखण्यास मदत होणार आहे.

पॅनकार्ड, बॅंक खाते, मोबाइल क्रमांक, गॅस कनेक्‍शन आदींसाठी आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक असणे आवश्‍यक आहे.

त्याच धर्तीवर सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक नोंदविला जाणार आहे. त्यानुसार राज्याच्या भूमि अभिलेख विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यात सुमारे 23 कोटींपेक्षा अधिक सातबारे उतारे आहेत. बनावट सात-बारा उतारा अथवा जमीन मालकांच्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्‍ती उभी करून जमिनीची खरेदी विक्रीचे प्रमाण वाढत आहे.

त्यास आळा बसावा, जमीन मालकांची तसेच खरेदीदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी उताऱ्यावर आधार कार्ड क्रमांक टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दस्त नोंदणी कार्यालयात बायोमेट्रिक सिस्टिम पूर्वीपासूनच आहे. सातबाऱ्यावर आधार नंबर दिल्यास दस्त नोंदणीच्या वेळी नोंदणी निरीक्षकांना मालकी हक्‍काची खात्री करून घेणे सोयीचे होणार आहे.

सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक नोंदविण्यासाठी “एनआयसी’मार्फत संगणक प्रणाली विकसित करण्यात येत आहे. याचसह महसूल कायद्यामध्ये काही बदल करावे लागणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वी हवेली तालुक्‍यामध्ये सातबारा उताऱ्यावर आधारक्रमांक नोंदविण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतले होते. मात्र, त्यामध्ये पुढे फारसी प्रगती झाली नाही. आता ही संगणक प्रणाली तयार झाल्यानंतर एका तालुक्‍यात प्रायोगिक तत्वावर सातबारा उताऱ्यावर आधार नोंदणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

त्यानंतर यामध्ये येणाऱ्या अडचणी अथवा नागरिकांच्या सूचनांचा विचार करून आवश्‍यक ते बदल केले जाणार आहे. त्यानंतर राज्यभरात ही योजना राबविली जाणार आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.