loader image
[ays_poll id=7]

सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी : प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

Dec 1, 2021

नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमिन भाडे पट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत ०.५ ते २ मे.वॅ. क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने, शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि पाणी वापरकर्ता संघटना (डब्ल्यूयुए) हे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करु शकतात आणि जर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते विकासकांद्वारे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकतात. विकासक आणि जमिन मालक यांच्यात भाडे पट्टी करार केला जाईल, त्या भाडे पट्टी कराराद्वारे जमिन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे.

या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरणमार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात. हा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ के व्ही. उपकेंद्राशी थेट जोडला जाईल.

प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) अंतर्गत या योजनेमध्ये निविदेद्वारे भाग घेण्याकरिता शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि पाणी वापरकर्ता संघटना (डब्ल्यूयुए) यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत. तथापि, विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरिता पुढील अटी बंधनकारक राहतील. बयाणा रक्कम (इएमडी) रु. १ लाख/ मेगावॅट, परफॉर्मनस बँक गॅरंटी (पीबीजी) रु. ५ लाख मेगावॅट, उद्देशिय पत्र जारी केल्यापासून १२ महिन्यांच्या आत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वन करणे बंधनकारक राहील. वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून २५ वर्षाकरिता रु. ३.१० प्रति युनिट दराने राहील.

या योजनेअंतर्गत महावितरणने ४४४ मे.वॅ. करिता निविदा जाहिर केल्या आहेत. निविदा भरण्याची शेवटची तारीख दि. ०६.१२.२०२१ आहे. या योजनेत मोठया संख्येने सहभागी होवून त्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. निविदेत भाग घेण्यासाठी महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatApp या वेबपोर्टलवर भेट द्यावी.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.