loader image
[ays_poll id=7]

महापरीनिर्वाण दिनी सर्वांना अभिवादन करता येणार आहे – महापौर किशोरी पेडणेकर !

Dec 2, 2021

येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईत येतात. पण, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजन करण्यात येणार आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

गेल्या वर्षी देखील कोरोनाचं संकट होतं. त्यामुळे मोजक्या लोकांना चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संधी दिली होती. यंदा सर्वांना बाबासाहेबांना अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी चैत्यभूमीच्या बाहेर रांगा लागतील. लाखो अनुयायी मुंबईमध्ये येतील. त्यांचं उन, पावसापासून संरक्षण करण्यासाठी निवारे तयार करण्यात आले आहेत. तसेच त्यांना खायला सुद्धा देण्यात येणार आहे. मात्र, ओमिक्रॉनचा धोका पाहता सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईत असणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांना ऑनलाइन अभिवादन करावं. कारण, त्यांना कधीही चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेता येतं. बाहेरून आलेल्या लोकांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापौर, उपमहापौरांनी अभिवादन केल्यानंतर सर्वांना अभिवादन करण्याची संधी दिली जाईल, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
.