Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अवकाळी पावसाने घेतला १७ शेळ्यांचा बळी

Dec 2, 2021

मनमाड:- येथील परिसरातील पानेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे,थंडी, वाऱ्यामुळे १७ शेळ्या आणि मेंढ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज घडली असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पानेवाडी येथील सुरेश कांदळकर असे या पधुधन मालकाचे नाव असून अचानक आलेल्या बेमोसमी आणि अवकाळी पावसाने शेळ्या,मेंढ्या ठार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत तलाठी श्री. शिरसाट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
पशुपालक कांदळकर यांनी सांगितलं,की पत्र्याचे शेड असले तरी आजूबाजूने उघडे आहे त्यामुळे रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शेळ्या व मेंढ्या पावसातच उभ्या होत्या. पावसामुळे चिखल झाला होता व बसायला जागा नसल्यामुळे गारठून त्यांचा प्राण गेला. दरम्यान,परिसरात रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटाका बसलाच त्याचबरोबर आहे.पशुधन पालक आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत असल्याची चिंता शेतरीवर्गामधून व्यक्त केले जात आहे.
सोबत फोटो—

संबंधित घटनेचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी,अशी मागणी केली जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी,पानेवाडी येथील

मेंढपाळ आकडे 225 मेंढ्या तलाठी जीएस शिरसाट यांनी केला पंचनामा सर्व मृत मेंढ्यांचा शेव विच्छेदन करण्याच्या सूचना त्यामुळे नेमके काय कारणाने मेंढ्यांचा व शेळ्यांचा मृत्यू झाला त्यानंतर खरे कारण समजून खुलासा होईल

 

अजून बातम्या वाचा..

मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरु करण्यात यावी – मनमाड शहर वेलफेअर असोसिएशन व प्रवासी संघटनेची मागणी !

मनमाड शहर व परिसरातून दैनंदिन कामानिमित्त / उदरनिर्वाहासाठी / व्यापारासाठी तसेच दवाखान्याच्या...

read more

मनमाडच्या भारतीय खाद्य निगम मध्ये अजब प्रकार : कार्यक्रम आझादीच्या अमृत महोत्सवाचा ….अन नागरिकच कार्यक्रमापासून अनभिज्ञ!

भारतीय खाद्य निगम, मनमाड यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या...

read more

ॲमेझॉनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : मनमाड टिम केट व व्यापारी महासंघाची मागणी !

अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ॲमेझॉन यांनी ऑनलाईन माध्यमातून नशिली पदार्थाचे विक्री केली त्याबद्दल...

read more

अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री निलमणी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]