Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित : राज्याची डोकेदुखी वाढणार !

Dec 3, 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतुन महाराष्ट्र सावरत असतानाच आता ओमिक्रान वेरिएंटने देशासमोर नवीन आव्हान उभे केले आहे. त्यातच कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनच्या दोन केसेस सापडल्यानंतर महाराष्ट्राची डोकेदुखी वाढलीय.

आता महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित असल्याची माहिती प्रशासनानं दिलीय. हे सर्व संशयित मुंबई, पुणे, ठाणे या मोठ्या आणि गजबजलेल्या शहरांमध्ये आहेत. संशयितांपैकी एकट्या मुंबईत 10 जण आहेत तर इतर 18 जण हे विविध शहरात आहेत. हे सर्व जण गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. यातले 25 जण हे परदेशी प्रवास करुन आलेत तर 3 जण हे त्यांच्या संपर्कातले आहेत. ह्या सर्वांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आलेत. ओमिक्रॉनची एस जिन चाचणीही करण्यात आलीय. त्याचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने नागरिकांना नवीन नियमावली जाहीर करीत कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर शिवसेनेतर्फे आज हुतात्मा चौकात  पुलवामात झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

नांदगाव शहर शिवसेनेतर्फे आज हुतात्मा चौकात पुलवामात झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

नांदगाव शहर शिवसेनेतर्फे आज हुतात्मा चौक नांदगाव येथे काश्मीर पुलवामात झालेल्या हल्ल्यात शहीद...

read more
अंडरपास भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी : नामदार भुजबळांची मागणी

अंडरपास भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी : नामदार भुजबळांची मागणी

येवला मतदारसंघ कार्यक्षेत्रात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या मनमाड - दौंड व मनमाड - हैद्राबाद रेल्वे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]