loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित : राज्याची डोकेदुखी वाढणार !

Dec 3, 2021


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतुन महाराष्ट्र सावरत असतानाच आता ओमिक्रान वेरिएंटने देशासमोर नवीन आव्हान उभे केले आहे. त्यातच कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनच्या दोन केसेस सापडल्यानंतर महाराष्ट्राची डोकेदुखी वाढलीय.

आता महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित असल्याची माहिती प्रशासनानं दिलीय. हे सर्व संशयित मुंबई, पुणे, ठाणे या मोठ्या आणि गजबजलेल्या शहरांमध्ये आहेत. संशयितांपैकी एकट्या मुंबईत 10 जण आहेत तर इतर 18 जण हे विविध शहरात आहेत. हे सर्व जण गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. यातले 25 जण हे परदेशी प्रवास करुन आलेत तर 3 जण हे त्यांच्या संपर्कातले आहेत. ह्या सर्वांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आलेत. ओमिक्रॉनची एस जिन चाचणीही करण्यात आलीय. त्याचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने नागरिकांना नवीन नियमावली जाहीर करीत कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.