Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एस .पी. एच महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

Dec 6, 2021

नामपुर: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रम महाविद्यालयाचे .प्राचार्य डॉ आर पी भामरे व वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ यू बी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रा जितेंद्र एस सूर्यवंशी यांनी मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी व शैक्षणिक सामाजिक राजकीय कार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली.तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक ए डी पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांनी केलेल्या शिक्षण कार्याविषयी सविस्तर विवेचन केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस आर निकम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच निकम सर म्हणाले की, महापरिनिर्वाण दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.
सदर कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील जेष्ठ शिक्षक एम एम भामरे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक तसेच महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एस महाले यांनी केले. सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु अस्मिता भामरे हिने केले व आभार प्रा. महाले जी एच यांनी केले

अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]