मनमाड – अथक परिश्रम, ग्राहकांचा विश्वास, गुणवत्ता, दर्जा यामुळेच ‘इवलेसे रोप लाविले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ हे साध्य होऊ शकले हे श्री गणेश ज्वेलर्स या फर्मच्या नूतन, अत्याधुनिक अशा शोरूमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दिसून आले. २१ वर्षांपूर्वी आपल्याच घरात काळ्या मण्याची पोत बनवण्याचे काम भंडारी परिवाराने सुरू केले. त्याचा विस्तार होत गेला. जवळपास शंभर ते दीडशे कामगार रोज या कामांमध्ये व्यस्त राहत होते. गुणवत्तेमुळे ही पोत राज्याच्या विविध भागात, गावात पोहोचली. त्यानंतर चांदीचे दागिने बनवण्याचे काम देखील सुरू झाले आणि यातून प्रेरणा मिळाली ते आपले स्वतःचे सोन्या चांदीचे दुकान असावे. त्याला देखील परिवाराने चालना दिली आणि श्री गणेश ज्वेलर्स हे सराफ बाजारात नवीन दालन सुरू झाले. ग्राहकांचा विश्वास, आपुलकीची भावना यातून सराफ सुवर्णकारीचा व्यवसाय वाढत गेला. आज नाशिकसह मनमाड शहरात सोन्या-चांदीच्या व्यापारांमध्ये एक विश्वसनीय नाव म्हणजे श्री गणेश ज्वेलर्सचे आहे. १९८० पासून चांदीचा व्यवसाय सुरू करून अख्ख्या महाराष्ट्रात चांदीचे दागिने पाठवण्याची काम सुरू केले आणि त्याला आजपर्यंत मूर्त स्वरूप मिळत गेले.
२२ कॅरेटमधील विविध डिझाइन्स म्हणजेच कलकत्ता, बंगाली कास्टिंग, अँटिक ज्वेलरी, रोज गोल्ड ज्वेलरी, फॅन्सी गोल्ड ज्वेलरी, मोत्यामधील ज्वेलरीसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. तसेच, डायमंडमध्ये मोठ्या प्रमाणात डिझाइन्स आहेत. चांदीची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी शोरूममध्ये स्वतंत्र दालन उभारले आहेत. श्री गणेश ज्वेलर्समध्ये सुसज्ज असा स्टाफ, आधुनिक बिलिंग सिस्टम याचबरोबर कुटुंबाचा मोठा हातभार यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा देता येणे शक्य असल्याचे ललीत भंडारी सांगतात. आई, वडील आणि मोठे बंधू निर्मल भंडारी लहान बंधू जयेश भंडारी तसेच पत्नी दिप्ती भंडारी कुटुंब सांभाळण्यासोबतच व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करतात.
दै. लोकमत तर्फे ‘बँडस् ऑफ नाशिक’ हा मानाचा पुरस्कार श्री गणेश ज्वेलर्सचे श्री. ललित भंडारी यांना मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!