Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

Dec 6, 2021

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला .
याप्रसंगी प्राचार्य डॉ.ए.व्ही. पाटील यांनी आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशासाठी राज्यघटना निर्माण करण्याचे केलेले कार्य महान व अतुलनीय आहे. तसेच भारतातील स्पृश-अस्पृश्य भेदभाव नष्ट व्हावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे एक महामानव म्हणून जागतिक स्तरावर त्यांचा नावलौकिक आहे असे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.देविदास सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ.पी. जी. आंबेकर, कनिष्ठ विभाग उपप्राचार्या सौ.ज्योती पालवे, वरिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ. सतीश तांबे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, कुलसचिव समाधान केदारे, प्राध्यापक वृंद, कार्यालयीन सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]