Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अनुदान मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच घेताना ग्रामसेविका जाळ्यात !

Dec 11, 2021

अनुदान मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ९०० रुपयांची लाच स्वीकारताना कातरवाडी (ता. चांदवड) येथील ग्रामसेविका अनिता कुटेमाटे यांना मनमाड येथे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतातील उभे असलेले पीक पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जात असून, यासाठी ग्रामसेवकाकडे अनुदान मिळण्यासाठी गेले असता फिर्यादीला अनेकदा चकरा मारण्यास लावून ग्रामसेवक अनिता कुटेमाटे यांनी फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. १००० रुपयांची मागणी केली असता तडजोडीअंती ९०० रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. सानप कॉम्प्लेक्स येथील एका हॉटेलवर ९०० रुपयांची लाच स्वीकारताना पथकातील पोलिस निरीक्षक साधना इंगळे, हवालदार सचिन गोसावी, पोलिस नाईक अजय गरुड, राजेंद्र गिते, अशोक धामंदे यांनी कुटेमाटे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. 

अजून बातम्या वाचा..

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]