Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात मानवी हक्क दिन साजरा!

Dec 12, 2021

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अॅडव्होकेट मुनिया गुप्ता या उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून मानवी हक्क म्हणजे काय? मानवी हक्क दिन केव्हा पासून आणि का साजरा केला जातो? याविषयी माहिती देवून तो साजरा करण्या पाठीमागील इतिहास व वैश्विक जाहीरनामातील 30 कलमांसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील यांनी आपल्या मनोगतातून प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात आपल्या समाजात असलेली विषमता त्यामुळे समाजातील बहुसंख्य लोकांना स्वतंत्रपणे जीवन जगायला मिळाले नाही तसेच त्यांना मानव म्हणून कुठलेही अधिकार प्राप्त झालेले नव्हते असे उदाहरण देऊन स्पष्ट केले. मानवी हक्काचे महत्त्व विशद करून याविषयी नागरिकांनी जागरूक असावे असे आवाहन केले. कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या प्रा. सौ.ज्योती पालवे, प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी.व्ही. सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.एन. ए. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील महिला विकास समितीच्या अध्यक्षा प्रा. सौ. कविता काखंडकी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]