नांदगाव तालुक्यातील कऱ्ही येथील माध्यमिक विद्यामंदिर येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. क्रा.वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात १३ डिसेंबर १९१२ रोजी झाला. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी विविध आंदोलनात सहभाग घेतला. सायमन कमीशनला विरोध करीत महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला व तुरंगवास देखील भोगला. भूमीगत राहून त्यांनी इग्रंजांना सळो की पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेतील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणूनही त्यांना बहुमान मिळाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नाशिकमधून दोनदा आमदार म्हणून निवडून आले. क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचे देशकार्यातील योगदान अतिशय मोठे आहे. सरकारने आजवर त्यांच्या कार्याची नोंद शासकीय दप्तरात करणे आवश्यक होते. मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी जशी त्यांची स्मृती जपली आहे तसेच शासनाने त्यांच्या कार्याची स्मृती जपली पाहिजे अशी कळकळीची अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलक रेखाटन – दि. 15 ऑगस्ट 2025. 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन.
15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. याच दिवशी आपला देश स्वतंत्र होऊन नव्या...












