loader image
[ays_poll id=7]

वारसांना स्थानिक ठिकाणीच नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, यासाठी प्रयत्न करणार – आ.कांदे !

Dec 14, 2021


मराठा क्रांती आंदोलनात बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या वारसदारांना सहकार आणि निमसरकारी क्षेत्रातील कुठल्याही नजिकच्या ठिकाणी अथवा राहत्या ठिकाणी नोकरीत प्राधान्यक्रम देण्यात यावा अशी लक्षवेधी मागणी आपण हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे सूतोवाच आमदार कांदे यांनी सकल मराठा समाज आणि मराठा तीतुका मेळवावा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

अँड. उमेशकुमार सरोदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार कांदे यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला. आमदार कांदे यांनी शासनाकडे केलेला पाठपुरावा व नोकरीत सामावून घेण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली होती. त्या मागणी राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद देखील दिला आहे.

याप्रसंगी पं.स.माजी सभापती विलास आहेर, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, उमेश उगले, सागर हिरे, अभिजित आहेर, संदीप भदाणे, निलेश कवडे, प्रवीण देशमुख, प्रशांत गवांदे, संजय देशमुख आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.