loader image
[ays_poll id=7]

निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड येथील रेल्वे थांबे पूर्ववत सुरू करणेकामी केंद्रीय रेल्वेमंत्री सकारात्मक – ना.डॉ.भारती पवार

Dec 17, 2021


नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड सह परिसरातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची , सरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली गैरसोय लक्षात घेता व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार ना.डॉ.भारती पवार यांचेकडे सातत्याने रेल्वेने नाशिक व मुंबई करिता दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात होत असलेली मागणी पाहता घेता त्याअनुषंगाने दि.१ डिसेंबर २०२१ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.श्री.अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. या प्रसंगी नांदगाव, मनमाड व लासलगाव येथील कोरोना काळात बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे पुर्वरत सुरु करण्याबाबत आग्रही मागणी केली. यामध्ये कोविडपूर्वी नांदगाव येथील लहान पुर्वरत असलेले थांबे कोविड काळात कमी करण्यात आले होते. तसेच कामयानी एक्सप्रेस (11071 व 11072) चा लासलगाव व नांदगाव येथील थांबा पुन्हा सुरू करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशांकडून विनंती मागण्या प्राप्त झाल्या होत्या. लासलगाव येथून मोठ्या संख्यने दैनंदिन प्रवासी नाशिक तसेच मुंबई उपनगरात नोकरी धंद्याच्या निमित्ताने प्रवास करतात. त्याचप्रमाणे या मार्गावर गाड्यांची उपलब्धता अतिशय कमी असल्याने परिसरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे व लोकमान्य टिळक टर्मिनल ते मनमाड जंक्शन दरम्यान धावणारी गोदावरी सुपरफास्ट एक्सप्रेस (12117) व (12118) काही काळापूर्वी बंद करण्यात आली आहे ती पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी जेणेकरून ह्या गाडीने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळेल. नांदगाव-इगतपुरी-नांदगावसाठी पुन्हा रेल्वे सुरू करण्यात यावी तसेच वरील रेल्वे थांबे तात्काळ निर्गमित करणे संदर्भात ना.डॉ.भारती पवार यांची केद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.