येवला शहरातील नगरपालिका क्षेत्रातील 19 रस्त्यांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ‘विशेष रस्ता योजनेअंतर्गत’ हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांमुळे शहरातील स्वच्छता आणि सुशोभीकरणात अधिक भर पडणार आहे. राज्यातील नगरपालिकांना रस्ते आणि अनुषंगिक बाबींचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष रस्ते अनुदान या योजनेतून निधी दिला जातो. या योजनेतून येवला शहरातील रस्त्यांची व भूमिगत गटारांची कामेही मार्गी लागणार आहेत.
मनमाड बाह्यवळण रस्ता (रिंगरोड) ची ठाकरे गटाची ना.भारती पवारांकडे मागणी
मनमाड - नांदगाव तालुका मतदारसंघामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या...










