मनमाड – नांदगाव तालुका मतदारसंघामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी तसेच महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचा त्वरीत पंचनामा करण्यासाठी गावतलाठीसह महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे तसेच वादळामुळे मोठ्या प्रमाणात विजवाहक तारा व पडलेले पोलची त्वरीत दुरुस्ती करण्याचे विज वितरण कंपनीस आदेश देण्यात यावे. मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा राज्य महामार्ग असलेला रेल्वे ओव्हरब्रीज पुल कोसळल्याने मनमाडच्या अर्ध्या भागाचा संपर्क तुटल्याने शववाहिका, रुग्णवाहिका व मोटारसायकल यांना जेण्याजाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी सदर कोसळलेल्या पुलाची वैधता संपल्याने त्याची डागडुजी न करता नवीन मनमाड बाह्यवळण रस्ता (रिंगरोडची) निर्मिती करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी केली आहे.

राशीभविष्य : १४ ऑक्टोबर २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...