loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या ८ खेळाडूंची नाशिक विभागीय संघात निवड

Dec 19, 2021


नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायाम शाळेच्या खेळाडूंची कौतुकास्पद कामगिरी केली असून यातील आठ खेळाडूंची श्रीरामपूर येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या संघात निवड करण्यात आली. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली गांगुर्डे, नूतन दराडे, दिया व्यवहारे, करुणा गाढे,साक्षी पांडे, धनश्री बेदाडे अनामिका शिंदे, श्रुतिका भंडारे यांनी आपापल्या वजनी गटात चमकदार कामगिरी करीत नाशिक विभागीय संघात स्थान मिळवले आहे. वरील सर्व खेळाडू कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करीत असून विद्यापीठ स्पर्धेत चांगली कामगीरी करतील असा विश्वास आहे यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे एनआयएस प्रशीक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ ,मुख्याध्यापिका सौ के एस लांबोळे, उपमुख्याध्यापक आर एन थोरात,पर्यवेक्षक संदीप देशपांडे ,जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड, डॉ विजय पाटील,मा नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील,प्रा दत्ता शिंपी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.