Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात ‘अद्वैत धर्म संवाद’ कार्यक्रम संपन्न

Dec 20, 2021

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे विश्वस्त डॉ. अद्वयआबा हिरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “अद्वय रंगभरण स्पर्धा “व “अद्वैत धर्म संवाद”या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी मौलाना अस्लम रिझवी जामा मशिद , भन्तेजी दीपंकर , जथेदार श्री. रणजीतसिंहजी गुरुद्वारा प्रबंधक, रेव्हरंड फादर सहायराज फर्नांडो मुख्य धर्मगुरू सेंट फ्रांसिस झेवियर चर्च हे सर्व धर्मगुरु उपस्थित होते. सर्व धर्मगुरूंनी आपल्या मनोगतातून माणुसकी व मानवतावाद हाच खरा धर्म आहे हे विशद केले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या विविधतेत एकता आहे. माणसातच देवपण शोधावे . मनुष्या मध्येच देव दडलेला असतो. मानव जरी विविध धर्माचे आचरण करीत असला तरी सर्व धर्माची विचारधारा व शिकवण एकच आहे. असे विचार सर्वांनी मांडले. त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही. पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की जगामध्ये एक सुपर पावर आहे आणि ही सुपर पावर म्हणजेच देव आहे प्रत्येक धर्माचे लोक या सुपर पावर चे अस्तित्व जाणून आपापल्या पद्धतीने भक्ती व उपासना करतात.त्याच बरोबर त्यांनी मानवतावाद व विविधतेत एकता भारतात कशी नांदते या विषयी माहिती दिली. सहिष्णुतेची व मानवतेचे शिकवण देखील प्रत्येक धर्मातुन दिली जाते. असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.कविता काखंडकी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा .एन ए. पाटील व आभार प्रदर्शन प्रा. डॉ.विष्णू राठोड यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. ज्योती पालवे,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]