Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बंगलूर घटनेचा नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिति तर्फे समाजकंटकांचा जाहिर निषेध

Dec 20, 2021

कर्नाटकातील बंगलुरु येथील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटांबना केली होती.त्याच्या निषेधार्थ मुस्लिम उत्कर्ष समिति चे जिल्हा अध्यक्ष सादिक़ पठान यांनी जिल्ह्यातील सर्व पधाधिकार्यांना निषेधाचे निवेदन देण्याचे आव्हान केले होते.त्या आव्हानाला प्रतिसाद देत मनमाड शहर शाखे तर्फे मंडल अधिकारी व मनमाड शहर पोलिस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की छत्रपति शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते.व् ते सर्व समाजासाठी आदर्श व एकतेचे प्रतीक आहे.परंतु काही राजकीय पक्ष आपले राजकीय हित संभाळण्यासाठी समाजकंटकांना हाताशी धरून सामाजिक बांधीलकी व सामाजिक सलोख्याचे वातावरण ख़राब करण्याचे प्रयत्न करीत आहे.अश्या घटनेचा नाशिक जिल्हा मुस्लिम ऊत्कर्ष समिति तीव्र शब्दांत निषेध नोंदवित आहे. शाषणाने अश्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन समाजकंटकावर कड़क कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.त्यावेळेस समितीचे जिल्हाध्यक्ष व मा नगरसेवक सादिक़ पठान, समाजसेवक आझाद पठान,जिल्हा संपर्कप्रमुख अल्ताफ शाह, जिल्हा संघटक मोहसिन शेख,शहर अध्यक्ष बाबा पठान,अख्तर शेख,उपाध्यक्ष इसरार शेख,जाविद शाह,अकबर शेख,वसीम सय्यद,शहीद शेख, इस्माईल पठान,मुफिज शेख,राजू शाह,शहबाज शेख,अक्षय वाघ, अकील शेख,इमरान पठान (डायमंड) इत्यादि उपस्तितित होते.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]