loader image

पनामा प्रकरण : ऐश्वर्या रॉयची इडीतर्फे चौकशी !

Dec 21, 2021


बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची सुनबाई ऐश्वर्या रॉय हिला पनामा प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकऱण चर्चेत आले आहे. यापूर्वी अभिषेक बच्चनने काही कागदपत्र ईडीला दिली होती. महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव या पनामा प्रकरणात आले होते. त्यांची काही परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक असून त्या कंपन्यांच्या संचालक बोर्डावर ते आहेत. त्यातील काही कंपन्यामध्ये ऐश्वर्याचेही नाव आले आहे. म्हणून बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. काल ऐश्वर्या ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर देखील झाली आहे.


अजून बातम्या वाचा..

.