सी, डी, जैन महाविद्यालय श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टींग स्पर्धेत जय भवानी व्यायाम शाळा व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी दोन सुवर्ण तीन रौप्य एक कांस्यपदक तसेच दिया किशोर व्यवहारे,नूतन बाबासाहेब दराडे,करुणा रमेश गाढे,यांची गुंटूर आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे
55 किलो वजनी गटात नूतन बाबासाहेब दराडे हिने 143 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले 64 किलो वजनी गटात साक्षी संजय पांडे हिने 139 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले 45 किलो वजनी गटात दिया किशोर व्यवहारे हिने 125 किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले 76 किलो वजनी गटात करुणा रमेश गाढे हिने 157 किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले 81 किलो वजनी गटात धनश्री विनोद बेदाडे हिने 135 किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले 49 किलो वजनी गटात खुशाली निवृत्ती गांगुर्डे हिने 144 किलो वजन उचलून कांस्य पदक प्राप्त केले, अनामिका मच्छिंद्र शिंदे श्रुति भंडारे यांनी चांगली कामगीरी केली
छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची गुंटूर आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ ,मुख्याध्यापिका सौ के एस लांबोळे, उपमुख्याध्यापक आर एन थोरात,पर्यवेक्षक संदीप देशपांडे ,जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड, डॉ विजय पाटील,मा नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील,प्रा दत्ता शिंपी,मनमाड महाविद्यायाचे प्राचार्य डॉ,ए.व्ही.पाटील,क्रीडा संचालक डॉ.दिनेश कराड यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मनमाड महाविद्यालयात जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन कार्यशाळा संपन्न
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड व राष्ट्रीय सेवा योजना...










