नगर – मनमाड राष्ट्रीय महामार्ग वर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या महामार्गावर अंदाजे 5 ते 7 किलोमीटर लांब रांगेचे विशाल स्वरूप पहायला मिळाले, या वाहतूक कोंडीच्या खोळंब्या मुळे प्रवाशांचे गेल्या तीन तास हाल झाले होते, वाहतूक कोंडी मुळे गाडीत बसून रहावे लागत असल्याने प्रवाशांच्या संतापाचा पारा चढला होता.
महामार्गावरील खड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. काही दिवसापूर्वी बी.ओ.टी यांनी रस्त्याची डागडुजी केली होती . पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने परत खड्डे निर्माण झाले व त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे.असे नागरिकांतर्फे सांगण्यात येत आहे,
एक तर राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे गाडी चालवणं प्रवाश्यांना साठी जणू तारेवरची कसरतच आहे,













