loader image

मनमाड भाजपाच्या वतीने सुशासन दिन साजरा !

Dec 25, 2021


भाजपा कार्यकर्त्यांचे सर्वोच्च प्रेरणास्थान, संवेदनशील कवी, उत्तम लेखक, आदर्श वक्ते, अभ्यासु पत्रकार आणि जागरूक निस्वार्थी राजकारणी, भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 97 व्या जयंती निमित्त मनमाड शहर भाजपा मंडलच्या वतीने त्यांना अभिवादन व सुशासन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनंता भामरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सर्व प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनंता भामरे व भाजपा शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे हस्ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी स्वर्गीय वाजपेयी यांचे आदर्श राजकीय जीवन प्रवासाच्या आठवणींना आपले मनोगतातुन उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहर अध्यक्ष जलील अन्सारी व भाजपा मनमाड शहर सरचिटणीस नितीन परदेशी यांनी केले. या प्रसंगी स्वर्गीय वाजपेयी यांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी भाजपा जेष्ठ नेते कांतीलाल लुणावत, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा, अल्पसंख्याक मोर्चा जैन प्रकोष्ठचे शहर अध्यक्ष आनंद बोथरा, भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे,  भाजपा दिव्यांग आघाडीचे मनमाड शहर अध्यक्ष दिपक पगारे, मयूर माळी, अकिल शेख, आदिंसह भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी केले होते.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.