loader image

लसीकरणाचा वेग वाढवा – अश्विनी आहेर

Dec 29, 2021


प्राथमिक आरोग्य केंद्र नायडोंगरी व पिंपरखेड ता. नांदगांव येथे मा. आर्की.अश्विनी अनिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची सभा घेण्यात आली.

सभेमध्ये रुग्ण कल्याण समितीचे उपाध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी मा.श्री. डॉ. संतोष जगताप, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री.डॉ. विष्णु आहेर, सरपंच श्रीम. सुशिलाबाई आहेरे,शोभा मोरे,श्री.योगेश वाघ, डॉ. अरुण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, मागील रुग्णकल्याण समितीचे इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले.कोविड नियमित लसीकरण बाबतचा आढावा, मातृवंदना / जननी सुरक्षा (JSY) /मानवविकास कार्यक्रम / फ्री डायट योजनांचा आढावा घेण्यात आला व ह्या योजनेपासून एक ही लाभार्थी वंचित राहणार नाही यांची सूचना सभापती आर्की. अश्विनी आहेर यांनी दिल्या,जि.प. स्तरावरून प्रा.आ.केंद्रा साठी मंजूर कामाचा आढावा घेतला,बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ( सिरीज पिट) चर्चा केली,नूतन इमारतीचे बांधकामचा आढावा,नवीन प्रा.आ.केंद्र इमारतीचे उद्घघाटन करणे बाबत विचार विनिमय केला,नवीन ईमारतीची पाहाणी केली काय काम अपूर्ण आहे आणि लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यास सभापती आदेश दिले,रुग्णकल्याण समिती चे खर्च अहवाल व लेखा परिक्षणाबाबत चर्चा केली,रिक्त पदांची माहिती घेऊन रिक्त पद भरण्याबाबत चर्चा केली,आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांच्या कामकाजाबाबत माहिती व नेमणूकी बाबत आढावा घेतला,
चालू वर्षात प्राप्त अनुदानातून खर्चास मंजूरी देणे बाबत चर्चा केली.सभेमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष साबळे, डॉ. प्रशांत तांबोळी, डॉ. शुभम आहेर, डॉ. अमित गायकवाड गट प्रवर्तक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रुग्ण कल्याण समिती सदस्य व इतर कर्मचारी उपस्थित होते.🙏


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.