loader image

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार : नाशिकमध्ये होणार सन्मान !

Dec 31, 2021


सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर यांना नाशिकमधील अत्यंत मानाचा समजला जाणारा सुविचार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात अविरतपणे काम करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने सुविचार मंचतर्फे गौरव करण्यात येतो.

२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा.नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे.

कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव विशेष पुरस्काराने सन्मानित येणार आहे. हेमंत राठी यांना जीवन गौरव पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ. अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडू ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांनाही सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
.