loader image
[ays_poll id=7]

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार : नाशिकमध्ये होणार सन्मान !

Dec 31, 2021

सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर यांना नाशिकमधील अत्यंत मानाचा समजला जाणारा सुविचार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात अविरतपणे काम करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने सुविचार मंचतर्फे गौरव करण्यात येतो.

२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा.नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे.

कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव विशेष पुरस्काराने सन्मानित येणार आहे. हेमंत राठी यांना जीवन गौरव पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ. अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडू ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांनाही सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

अजून बातम्या वाचा..

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.  नांदगाव सोमनाथ घोंगाणे

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली...

read more
खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पटना बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन...

read more
कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २००० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे...

read more
नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यांवर संत श्री सेवालाल जयंती साजरी – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती

नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यांवर संत श्री सेवालाल जयंती साजरी – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती

संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आज सौ.अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यांवर उपस्थित राहून...

read more
.