Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती शहरात विविध ठिकाणी साजरी….

Jan 4, 2022

भारताच्या प्रथम महिला शिक्षीका , उत्तम कवियित्री , अध्यापिका , समाजसेविका आणि पहिल्या विद्याग्रहण करणाऱ्या महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती मनमाड शहरातील विविध संघटना , संस्था आणि शाळेमध्ये साजरी करण्यात आली.भारतातील स्त्री शिक्षणाच्या जनक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सावित्री माईंनी महिलांना शिक्षण देण्यासाठी त्या काळी अनेकांच्या विरोधाचा सामना करून महिलांना शिक्षण देण्याचे काम केले , आज समाजामध्ये महिलांच्या अनेक क्षेत्रातील प्रगती मध्ये सावित्रीबाईंचे खुप मोठे उपकार आहे.मनमाड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथे महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. शहरातील आय. यु. डी. पी. परिसरात असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका येथे मनमाड बचाव कृती समितीच्या सर्व महिला आणि पुरुष सदस्यांच्या वतीने ज्ञानाज्योत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.पल्लवी मंगल कार्यालय येथे काकडे परिवार आणि पल्लवी केटरर्सच्या सर्व सदस्यांच्या वतीने समाजसेविका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.शहरातील विविध शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून लहान मुलींनी सावित्रीबाई यांची भूमिका सादर केली.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]