Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

निवडणूक खर्च : निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा !

Jan 7, 2022

आगामी काळात होऊ घातलेल्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची प्रतिक्षा असतानाच निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना ९० लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. याआधी ही मर्यादा ७० लाख रुपये इतकी होती. तर दुसरीकडे छोट्या राज्यांमधील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ५४ लाखांवरून ७५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन देखील काढलं असून त्यामध्ये कोणत्या राज्यासाठी खर्चाची किती मर्यादा आहे, हे नमूद करण्यात आलं आहे.

लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. आगामी ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव दिसून येऊ शकतो. विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर लहान राज्यांसाठी ही मर्यादा २० लाखांवरून २८ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

कुठल्याही गावाला दूषित पाणीपुरवठा होता कामा नये : आढावा बैठकीत लीना बनसोड कडाडल्या

कुठल्याही गावाला दूषित पाणीपुरवठा होता कामा नये : आढावा बैठकीत लीना बनसोड कडाडल्या

नांदगाव( प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी...

read more
केंद्र शासनाच्या अमृत २ /० योजनेत नांदगाव व मनमाड शहराचा समावेश आ.सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश

केंद्र शासनाच्या अमृत २ /० योजनेत नांदगाव व मनमाड शहराचा समावेश आ.सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश

नांदगाव : याबाबत वृत असे की केद्रं शासनाच्या अमृत २/० या योजनेत नांदगाव व मनमाड शहराचा समावेश...

read more
भाजपा मनमाड नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष व 33 जागा स्वबळावर लढविणार ; केदानाना आहेर

भाजपा मनमाड नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष व 33 जागा स्वबळावर लढविणार ; केदानाना आहेर

आगामी काळात मनमाड नगरपालिका च्या पंचवार्षिक निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने मनमाड शहर भाजपाची...

read more

(बघा व्हडिओ) ऐन पावसाळ्यात हिसवळच्या ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरत आंदोलन

गिरणा धरणावरील ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या सदोष यंत्रणेमुळे हिसवळ खुर्द हिसवळ बु. ग्रामस्थांना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]