loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हडिओ) ऐन पावसाळ्यात हिसवळच्या ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरत आंदोलन

Jul 15, 2022


गिरणा धरणावरील ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या सदोष यंत्रणेमुळे हिसवळ खुर्द हिसवळ बु. ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक वेळा पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नांदगाव मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले

याचवेळी ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेतुन सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढवळे साहेब पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कापसे साहेब.

नांदगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरवाडकर साहेब,पो. बोगीर साहेब, पो. सोनवणे साहेब,हिसवळ खुर्द चे सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, सदस्य- नानासाहेब आहेर, सुदाम आहेर बंडूकाका आहेर, लखन आहेर, शांताराम लोखंडे, संदीप कदम, संदीप आहेर, माजी सरपंच विजय आहेर, माझे सरपंच मोहन दादा आहेर, माजी सरपंच संजय बापू आहेर,हिसवळ बु. सरपंच बाळू नाना बेंडके, रवींद्र देशमुख, श्रावण भालेराव, राजेंद्र करवर यासह, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचीही गाडी ग्रामस्थांनी अडवली व आपले संपूर्ण गर्हाणे त्यांच्यासमोर मांडले यातून लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढण्याचेही लीना बनसोड यांनी ग्रामस्थांना सांगितले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.