loader image
[ays_poll id=7]

१६ जुलै देशव्यापी बंदला मनमाड शहर शिवसेनेचा पाठिंबा

Jul 15, 2022


अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5% जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतल्याचे समजते आहे. सदरबाबतचे नोटीफिकेशन दि. 13 जुलै 2022 रोजी काढलेला आहे. केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर 5% जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी, छोटे व्यापारी आणि पर्यायाने सामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे महागाई अजूनच वाढून सर्वसामान्य जनता यात भरडली जाणार आहे.
जी.एस.टी. मध्ये अन्नधान्य, गुळ, कडधान्य या वस्तूंचा समावेश केला आहे. सदर जीएसटी दि. 18 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. याबाबत चेंबर ऑफ कॉमर्स ने देशव्यापी बंद शनिवार दि. 16 जुलै 2022 रोजी पुकारला आहे. त्यामध्ये मनमाड येथिल किराणा व्यापारी असोसिएशन, अन्न धान्य व्यापारी हे सहभागी होणार आहे.
त्यांच्या या मागणीला मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. शिवसेना ही सदैव सामान्य जनतेच्या सोबत आहे.
या निर्णयाचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत.
केंद्र सरकारने हा अन्यायकारक व मॉल संस्कृती च्या हितासाठी घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा अन्यथा व्यापारी, शेतकरी व जनतेसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी दिला आहे.
           


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.