Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पाच राज्यात वाजला निवडणुकीचा बिगुल!

Jan 9, 2022

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा (Assembly Election 2022) निवडणुकांच्या तारखांचे बिगूल अखेर वाजले असून या निवडणुका सात (Five State Assembly Election In Seven Phase ) टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे, असे निडवणूक आयोगाने जाहीर केले आहे.
तर, मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे (Election Result). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलींना (Rally) 15 जानेवारीपरर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसचे रोड शो आणि बाईक शो (Road Shoe & Bike Show) वर देखील बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकांच्या काळात गुन्हेगारी (Criminal Record) पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती जाहीर करावी लागणार असल्याचे आयोगाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.या वर्षी मतदान केंद्राची संख्या 2 लाख 15 हजार 368 आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. (Five State Assembly Election Dates Declared ).
कोणत्या राज्यात कधी मतदान?
उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यानुसार पहिला टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च रोजी, तर सातवा टप्पा 7 मार्च 2022 पार पडणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा या तीन राज्यांमध्ये 14 फेब्रुवारी 2022 रोजी एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च 2022 रोजी दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. (Five States Assembly Election State Wise Dates)
सुविधा अॅपच्या माध्यमातून दाखल करता येणार अर्ज

निवडणुकीपूर्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत ( Election Commission Of India ) चर्चा केल्याचे आयोगाकडून यावेळी सांगण्यात आले. निवडणुकांच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती जाहीर करावी लागणार असल्याचे आयोगाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे निवडणुका घेणे आवानात्मक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुशील चंद्रा यांनी यावेळी सांगितले. 690 विधानसभांच्या जागांवर निवडणुका होणार असून, 24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या वर्षी सुविधा अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सोय करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रावर असणार मास्क आणि सॅनिटायझर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 24.9 लाख नागरिक पहिल्यांदाच मतदाराचा अधिकार बजावणार असून एकूण 18 कोटी 30 लाख मतदार मतदानाचा हक्क बजाणावणार आहेत. दरम्यान प्रतेयेक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे. 80 पेक्षा जास्त वय असणारे, दिव्यांग आणि कोरोनाबाधित असणाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंगची सोय देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

अजून बातम्या वाचा..

नगरपरिषद कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; मनमाड ला काळीफित लावून कामबंद आंदोलन

नगरपरिषद कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; मनमाड ला काळीफित लावून कामबंद आंदोलन

महाराष्ट्र नगरपरिषद ,नगरपंचायत कर्मचारी,संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने नगरपरिषद कर्मचा-यांच्या...

read more
चांदवड तंत्रनिकेतनात शिक्षकांसाठी प्रशिक्षणसायबर सुरक्षा आणि सायबर फॉरेन्सिक इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन.

चांदवड तंत्रनिकेतनात शिक्षकांसाठी प्रशिक्षण
सायबर सुरक्षा आणि सायबर फॉरेन्सिक इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन.

श्री नेमिनाथ जैन ब्रह्रमचर्याश्रम संचालित श्री एच एच जे बी तंत्रनिकेतन अंतर्गत कॉम्प्युटर...

read more
मी वंशज, पण भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – खा. युवराज संभाजीराजे छत्रपती

मी वंशज, पण भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – खा. युवराज संभाजीराजे छत्रपती

छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर...

read more
जातेगाव पिनाकेश्वर महादेव मंदिर : आमदार कांदे यांच्या प्रयत्नातून ४७५ लक्ष विकास निधी मंजूर

जातेगाव पिनाकेश्वर महादेव मंदिर : आमदार कांदे यांच्या प्रयत्नातून ४७५ लक्ष विकास निधी मंजूर

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नांदगाव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]