loader image
[ays_poll id=7]

दहा प्रमुख उत्सवांसाठी जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पिकर वाजविण्यास मुभा!

Jan 12, 2022


केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशान्वये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत सुट जाहीर करण्याकरिता जिल्हास्तरावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केले आहे.

यानुसार जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या वर्षातील जिल्ह्यातील दहा प्रमुख उत्सवांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर्स वाजवण्याची मुभा देण्यात आली असल्याचे जिल्हा दंडाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशान्वये कळविले आहे.

शासकीय आदेशात नमुद केल्यानुसार, केंदीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रणाच्या सुधारीत नियमानुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत श्रोते गृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंदिस्त जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी जिल्ह्याच्या गरजेनुसार वर्षामध्ये जास्तीत जास्त 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यानुसार जिल्हास्तरावर 2022 या वर्षातील ध्वनीची विहित मर्यादा राखुन सणोत्सवांच्या काळात दहा दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक सुरू ठेवता येणार असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशान्वये दिली आहे.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शासकीय जयंती उत्सव (Chhatrapati Shivaji Maharaj Government birth anniversary festival), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr Babasaheb Ambedkar birth anniversary), गणपती उत्सव (Ganesh Festival), गणपती आरास पाहण्यासाठी प्रत्येकी एक दिवस, गणेश विसर्जण (Ganesh Immersion Day) मिरवणूकीसाठी प्रत्येकी एक दिवस

नवरात्री उत्सव (Navratri), दसरा (dussehra), ईद-ए-मिलाद (eid e milad) , लक्ष्मीपूजन (laksmipoojan diwali 2022) दिवाळीसाठी एक दिवस, ख्रिसमस नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी एक दिवसाचा यात समावेश आहे.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.