छत्तीसगढ चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ माजली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचे वडील नंद कुमार बघेल अनेकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊन त्यांना अटक ही झाली होती.
अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
येवला (प्रतिनिधी) शाळा-महाविद्यालये तथा शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाच्या मौल्यवान कार्य प्रक्रियेत...










