Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री राहुल सोलापुरकर यांच्या व्याख्यानाने ‘विवेकानंद व्याख्यानमाला 2022’ चा समारोप

Jan 13, 2022

संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी विवेकानंद व्याखानमालेचे आजचे तिसरे पुष्प प्रसिद्ध वक्ते अभिनेते श्री राहुल सोलापुरकर यांच्या व्याख्यानाने होऊन ‘विवेकानंद व्याख्यानमाला 2022’ चा समारोप झाला.

गेल्या तीन दिवसांपासून छत्रे हायस्कूल येथील सितालक्ष्मी हॉल येथे विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन संस्कृती संवर्धन समिती तर्फे करण्यात आले होते , या कार्यक्रमास महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्त्यांच्या विचारांची मेजवानी ही समस्त मनमाडकर रसिक प्रेशकांना प्राप्त झाली. यंदाच्या वर्षी सार्वजनीक कार्यक्रमाला शासनाचे अनेक बंधन असल्याने सर्व शासकीय नियमांचे पालन करून व्याख्यान माला संपन्न झाली. आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक इंजिनिअर श्री.अक्षय उफाडे , प्रमुख पाहुणे श्री अशोक शिंगी , डॉ. श्री निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व मान्यवरांचा संस्कृती संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री प्रविण व्यवहारे आणि संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री योगेश म्हस्के यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार करण्यात आला.यंदाच्या वर्षीचा समिती तर्फे देण्यात येणारा विशेष पुरस्कार ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ हा श्री अनंता कुलकर्णी यांना तर ‘ आधुनिक सावित्री पुरस्कार’ सौ.दिपाली न्ह्यायदे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

आजचे प्रमुख वक्ते श्री राहुल सोलापुरकर यांनी ‘ स्वातंत्र्य संग्रामातील काही आज्ञात कथा’ या विषयावर आपले विचार मांडले.

सर्व शासकीय नियमांचे पालन करून , प्रत्यक्ष उपस्थित मर्यादीत संख्येने आणि ऑनलाईन स्वरूपातील श्रोत्यांच्या उपस्थितीत यंदाच्या वर्षीची व्याख्यानमाला संपन्न झाले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद काकडे , परिचय श्री योगेश सोनवणे आणि आभार समितीचे अध्यक्ष श्री योगेश म्हस्के यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]