Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव तालुकास्तरीय उत्कृष्ट बातमी लेखन पुरस्कार जाहीर !

Jan 13, 2022

मनमाड  शहरातून प्रसिध्द होणार्‍या दै जनश्रद्धा या वृत्तपत्रातर्फे   संस्थापक संपादक जेष्ठ पत्रकार कै. कांतीलाल गुजराथी व जेष्ठ पत्रकार कै शकुंतला गुजराथी यांच्या स्मरणार्थ व नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या विद्यमाने  उत्कृष्ट बातमी  लेखन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नांदगाव तालुकास्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ दि. १५  जानेवारी रोजी मनमाड येथे होणार असल्याची माहिती आयोजक जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, व  कार्यकारी संपादक सतिष शेकदार यांनी दिली. 
जाहीर करण्यात आलेले पुरस्कार पुढील प्रमाणे

उत्कृष्ट बातमी लेखन पुरस्कार प्रथम अमोल खरे, मनमाड दै सकाळ – ना अंगभर कपडे, ना खायला अन्न … बालपणातच भिकेची वेळ, द्वितीय शशिकांत पाटील – न्यायडोंगरी – दै ऍग्रोवन – कापूस उत्पादक खानदेशला टेक्स्टाईल पार्कची प्रतीक्षा तृतीय नरहरी उंबरे – मनमाड – दै पुण्यनगरी – सोशल हाकमुळे यशवंतला मिळाली त्याची आई,

सामाजिक बातमी लेखन पुरस्कार –

 १) मारुती जगधने – नांदगाव – दै पुढारी – सर्वेक्षणाची मोहीम करतेय कोरोनाची जोखीम दूर २) संजय मोरे – नांदगाव – दै देशदूत – ऊस तोडीसाठी मजुरांचे स्थलांतर ३) सोमनाथ घोंगाने – नांदगाव – दै दिनकर – नांदगावकरांचे समस्याबाबतचे आंदोलन  

समस्याप्रधान बातमी लेखन पुरस्कार १) धनंजय देशमुख – पिंपरखेड – दै पुढारी – स्वप्नांच्या पाठलागासाठी मजुरांचा थंडी वाऱ्याशी संघर्ष २) अनिल आव्हाड – नांदगाव – दै लोकनामा – जेंव्हा राजकिय नेत्यावर येते भाजीपाला विकण्याची वेळ ३) निलेश व्यवहारे – मनमाड – सतर्क पोलीस टाइम्स – भाऊ बीजेच्या दिवशीच भावाची हत्या,

उल्लेखनीय साप्ताहिक बातमी लेखन पुरस्कार१) उपाली परदेशी – मनमाड –  पत्रीसरकार २) रोहित शेळके – नांदगाव – शांकबरीच्या तिरावरून ३) सॅमसन आव्हाड – मनमाड – लोक वजीर,

ह्युमन स्टोरी बातमी लेखन पुरस्कार
१) संदीप देशपांडे – मनमाड – दै महाराष्ट्र टाईम्स – पाणी लागे पर्यंत तुमची विहीर खोदून देऊ २) प्रमित आहेर – नांदगाव – दै दिव्य मराठी –  तीन चिमुकल्या लेकींसोबत आई जागेवरच गतप्राण ३) अशोक बिदरी – मनमाड – लोकमत – तृतीयपंथीयांशी लग्न गाठींमुळे दाम्पत्य बनले सेलिब्रिटी,

उत्कृष्ट पोर्टल बातमी लेखन पुरस्कार १) तुषार गोयल – मनमाड – मनमाड ठिणगी २) नाना आहिरे – साकोरा – आवाज एन न्यूज ३) आंनद बोथरा – मनमाड – मनमाड ठिणगी ४) प्रज्ञानंद जाधव – नांदगाव – नाशिक न्यूज ५) अफरोज शेख – मनमाड – जन आवाज न्यूज ६) सुरेश नारायने – नांदगाव – गणतंत्र न्यूज

 उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार- योगेश म्हस्के – मनमाड – दै दिव्य मराठी – गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारावर आकर्षक रोषणाई फटाक्यांची आतषबाजी
 न्यूज चैनल

उत्कृष्ट वृत्तांकन पुरस्कार१) निलेश वाघ – मनमाड –  झी २४ तास २) अजय सोनवणे – मनमाड – एबीपी माझा ३) संदीप जेजुरकर – नांदगाव – लोकशाही न्युज

अजून बातम्या वाचा..

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

मनमाड - मनमाड येथील बी जी दरगुडे  पब्लिक स्कूलच्या शालेय परिसरात भव्य स्टेज व मंडप व्यासपीठ सजावट...

read more
वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नांदगाव मतदार संघ व मनमाड शहर व ग्रामिण भागात दुष्काळी परिस्थती असल्यामुळे सर्वत्र शेतकरी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]