Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड येथे लोहड़ी (लोहरी) उत्सव साजरा….

Jan 14, 2022

गुप्तसर साहेब गुरूद्वारा मनमाड येथे लोहड़ी उत्सव मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर 13 जानेवारीला रात्री शहरातील शिख बंधवांच्या उपस्थितित आनंदात साजरा करण्यात आला.

लोहड़ी हा पंजाब प्रांतात साजरा होणारा हिवाळ्यातील सुगीचा उत्सव आहे.उत्तर हिंदुस्थानातील शीख आणि हिंदू नागरिक हा उत्सव साजरा करतात. जानेवारी रोजी हा उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाशी संबंधित कथा आणि आख्यायिका पंजाब प्रांतात प्रचलित आहेत.लोहारी हा सूर्याच्या उत्तरायण संक्रमणाशी माघ महिन्यात येणारा उत्सव आहे. हिवाळा ऋतूला निरोप देणे असा या उत्सवाचा हेतू असतो.सामान्यत: मकरसंक्रांत सणाच्या आदल्या दिवशी लोहारी साजरा केला जातो.उत्तर भारतातील दिल्ली , पंजाब, हरियाणा या प्रांतात या दिवशी विशेष सुट्टी दिली जाते.

अग्नीपूजा हा या उत्सवातील महत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. हिवाळा ऋतू असल्याने शेकोटी पेटविणे याला पारंपरिक महत्व मिळाले आहे.गूळ,गजक, उसाचा रस यांचा समावेश या दिवशी खाण्यात आवर्जून समावेश केला जातो.गावाच्या मध्यभागी सूर्यास्ताला संध्याकाळी शेकोटी पेटविली जाते. लोक त्यामध्ये तीळ, गूळ वाहतात. त्याभोवती बसून लोकगीते गातात आणि पारंपरिक नृत्य करतात. शेतातील ताजी मक्याची कणसे भाजून खाणे हा एक विशेष कार्यक्रम असतो. शेतात आलेला लाल मुळा हा सुद्धा या दिवशी जेवणात समाविष्ट केला जातो. मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची पोळी, किंवा भाकरी ही या उत्सवाची महत्वाची मेजवानी असते. तीळ घालून केलेला भात या दिवशी जेवणात समाविष्ट असतो. याला त्रिचोली म्हटले जाते.पंजाब च्या काही प्रांतात लोहारी या देवतेची स्थापना केली जाते. गायीच्या शेणापासून ही मूर्ती तयार करून तिची सजावट केली जाते.लोहारी निमित्त सजलेली पंजाबी महिलासुगीच्या काळातील हाती येणा-या शेतातील पिकाचा आनंद साजरा करणे असे या सणाचे महत्व आहे.सूर्याचे उत्तरायण सुरु होवून दिवस मोठा होत असल्याने सूर्याची पूजा आणि स्तुती ही सुद्धा या उत्सवात केली जाते. दुल्ला भट्टी हा पंजाब प्रांतात एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखला जातो. अकबराच्या काळात हिंदू युवतीना पळवून नेले जात असे. त्या मुलींचे रक्षण करणारा म्हणून दुल्ला भट्टी विशेष प्रसिद्ध आहे आणि त्याला समाजात मानाचे स्थान आहे.त्याने वाचविलेल्या सुंदरी आणि मुन्दरी या दोन युवती पंजाबी लोककथांमधे अजरामर झाल्या आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने लहान मुले आसपास जाऊन लोकगीते म्हणतात त्यात याच्या नावाचा उल्लेख येतो. या लोकगीत गायनाच्या कार्यक्रमानंतर घरोघरी लहान मुलांना खाऊ आणि पैसे दिले जातात.

संत कबीर यांच्या पत्नी लोई यांच्या निमित्ताने हा उत्सव सुरु झाला अशीही एक मान्यता आहे लोई म्हणजे अग्नीतील तेज आणि उर्जा होय. होलिका आणि लोई या दोघी बहिणी असल्याचे काही ठिकाणी मानले जाते. सिंधी समुदायात लोई या नावाने हा सण साजरा केला जातो.

या कार्यक्रमास शहरातील सर्व शिख बांधव , मनमाड गुप्तसर गुरूद्वारचे प्रबंधक बाबा रणजीत सिंह जी , शहरातील आणि बाहेर गावाहुन आलेले भाविक उपस्थित होते , कार्यक्रमा नंतर बाबाजींच्या हस्ते सर्वांना प्रसाद देण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

मनमाड महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्वातंत्र्य...

read more
स्वातंत्राच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमीत्त आ.सुहास अण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप

स्वातंत्राच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमीत्त आ.सुहास अण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे):स्वतंत्रदिनाच्या अमृत महोत्सव साजरा करताना शासनाच्या वतीने विविध प्रकारचे...

read more
स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त नांदगाव कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त नांदगाव कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

नांदगाव: शहरातील म. वि.प्र.समाजाचे, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव...

read more

(बघा व्हिडिओ) वाघदर्डी ओव्हरफ्लो ; पाणीपुरवठा होणार सुरळीत ?

मनमाड : समस्त मनमाडकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मनमाडकरांचे पाण्याची जीवन वाहिनी असणारे...

read more

(बघा व्हिडिओ)राष्ट्रीय एकात्मता तिरंगा पदयात्राचे सर्व धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली आयोजन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे राष्ट्रीय एकात्मता तिरंगा पदयात्रा सर्व...

read more
युवा सेना नाशिक जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त डोणगाव आश्रम शाळेला शालेय वस्तूंचे वाटप

युवा सेना नाशिक जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त डोणगाव आश्रम शाळेला शालेय वस्तूंचे वाटप

मनमाड युवासेना कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्हा युवा सेना प्रमुख श्री फरहान दादा खान यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]