नांदगाव (सोमनाथ घोंगाणे):स्वतंत्रदिनाच्या अमृत महोत्सव साजरा करताना शासनाच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याचे पालन करत शाळांनी तसे नियोजन केले. या सर्वात विदयार्थी हा महत्वाचा घटक असतो. आजच्या विद्यार्थ्यानं मध्ये जे संस्कार आपण देवू राष्ट्रनिष्ठेची, देश भावनेची, एकात्मतेची जी भावना त्यात रुजवू तेच या देशाचे भवितव्य घडविणारं आहे. १५ ऑगस्ट हा आपणा सर्व भारतीयांचा राष्ट्रीय सन आहे आज आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाली असून याचा आनंद साजरा करताना गोडवा निर्माण होवून तो कायम टिकून राहवां आपला सर्वांचा आनंद द्विगुणित करण्यासाठीआ. सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. या प्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष सईद हाजी, आयाज शेख, रियाज पठाण अमजद , अक्रम , नईम,इम्रान, फहीम,नसिर,तन्वीर,आरीफ, तथा मुस्लीम समाज समन्वय समिती चे हाजी जहीर, चिराग सेठ, गयास टेलर, खलीलजनाब,नदीम,साजीद तांबोळी, अख्तर शेख, सोहेलभाई,वजीर बाबा,लतिफ सुपर,महमूद टेलर, असगर पठाण, मुश्ताक फीटर, फिरोज मुल्ला, अन्सार तसेच असंख्य मुस्लीम तरुण उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











