Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वेटलिफ्टींग खेळाडू नूतन बाबासाहेब दराडे हीची मनमाड नगर परिषदेतर्फे स्वच्छता राजदूत म्हणून नियुक्ती

Jan 16, 2022

मनमाड शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची जनजागृती करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०२२ अंतर्गत मनमाड नगरपरिषदेतर्फे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मनमाड शहराचा नावलौकिक करणारी वेटलिफ्टींग खेळाडू नूतन बाबासाहेब दराडे हीची मनमाड नगर परिषदेतर्फे स्वच्छता राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसे पत्र पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.विजयकुमार मुंढे यांनी दिले. स्वच्छ भारत अभियान २०२२ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मनमाड शहरात स्वच्छ अभियानात सहभागी होऊन नागरिकांना घर स्तरावर ओला व सुका कचरा विलागिकरण, घातक कचरा विलगिकरण, स्वच्छ मोहल्ला, कचरामुक्त शहर, प्लास्टिक वापरा वर बंदी या कार्यक्रमात सहभागी होऊन जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यासाठी नूतन बाबासाहेब दराडे हीची स्वच्छता राजदूत म्हणून घोषणा करण्यात आली. या प्रसंगी मनमाड शहर समन्वयक मयूर दुसे, दिनेश करोसिया,सतीश चावरिया,तुषार बोराडे,दिलीप थोरे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]