Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात लोकमाता महिलारत्न पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन “काव्यपुष्प” वाचन स्पर्धा कार्यक्रम संपन्न

Jan 17, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. ए. व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 17 जानेवारी रोजी माजी आरोग्यमंत्री लोकमाता पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने काव्यपुष्प वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी आणि रक्तदाते श्री. प्रदीप गुजराती लाभले त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आपल्या स्वरचित कविता देखील सादर केल्या मनुष्य जीवनात कवितेचे महत्व त्यांनी आपल्या मनोगतातून पटवून दिले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती ज्योती पालवे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विविध कविता सादर केल्या. सदर कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला व स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर प्रा.डॉ.गजानन शेंडगे तसेच महाविद्यालयातील भाषा विषयांचे प्राध्यापक वृंद यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. अमोल देसले यांनी तर आभार व्ही.ए.दासनुर यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव : मारुती जगधने हिदुंस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या वतीने क्लब एच पी यांच्या वतीने...

read more
लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

मनमाड - मनमाड येथील लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) तर्फे लोकसभा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]