Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एस पी एच नामपूर कनिष्ठ महाविद्यालयात covid-19 लसीकरण मोहिम संपन्न

Jan 20, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अंबासन, उपकेंद्र सारदे व नामपूर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने covid-19 लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉ. यु. बी. कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. उज्वल महाले, डॉ. अमित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.
डॉ. उज्वल महाले यांनी लसीकरण उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना लसीकरणाविषयी सखोल माहिती देऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यु बी कदम यांनी वाढत्या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे हे नमूद केले .
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लसीकरण मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी होऊन लसीकरण करून घेतले. या लसीकरण प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस आर निकम , पर्यवेक्षक श्री.ए डी. पाटील, कुलसचिव श्री शरद केदारे, श्री प्रा एम एम भामरे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहकारी शिंदे सर, सोनवणे सर, व पवार मॅडम उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा एस एस महाले यांनी केले. लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]