loader image
[ays_poll id=7]

सोमवार पासून होणार शाळा सुरू – निर्णय स्थानिक प्रशासन घेणार !

Jan 20, 2022

महाराष्ट्रात येत्या सोमवारपासून सर्व शाळा सुरु होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सोमवारपासून शाळा सुरू होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला परवानगी दिल्याचं मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

कोरोना प्रादुर्भाव आणि इतर बाबी तपासून शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्याचा निर्णय आजच्या विभागाच्या बैठकीत झाल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. दरम्यान, राज्यातली महाविद्यालयं चालू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. महाविद्यालयं सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अजून बातम्या वाचा..

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.