सध्या राज्यात थंडीची लाट पसरलेली असताना हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. यातील काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकर्यांसमोर पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे राहिले आहे.
यापूर्वी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 8 व 9 जानेवारीला अवकाळी पाऊस पडला. विशेषतः अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतरही भागातील शेतकर्यांना या पावसाचा फटका बसला. या नुकसानीच्या झळा ताज्या असतानाच पुन्हा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार 21 , 22 आणि 23 जानेवारीला पाऊस होणार आहे. या पावसाचा फटका साधारणतः कोकण आणि मध्य महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन
मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...








